• Home
  • all updates
  • कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदांचे निकाल रविवारी; मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था
Image

कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदांचे निकाल रविवारी; मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल येत्या रविवारी, २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असून नागरिकांचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. विविध ठिकाणी मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात असून प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मलकापूर नगरपरिषदेचा निकाल केवळ दोन फेऱ्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे, तर जयसिंगपूर नगरपरिषदेच्या निकालासाठी तब्बल १३ फेऱ्या पूर्ण होणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेसाठी सुमारे ७९० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांचे दोन प्रशिक्षण सत्र पूर्ण झाले आहेत, तर तिसरे सत्र सध्या सुरू आहे.

गडहिंग्लज नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ ‘अ’ साठी शनिवारी मतदान होणार आहे. या ठिकाणी २,४७९ मतदारांसाठी तीन मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मतमोजणी केंद्रांवरील नियोजनाबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. निकालानंतर कोणत्याही प्रकारच्या विजय मिरवणुका, रॅली किंवा गर्दीला परवानगी दिली जाणार नसून कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व ईव्हीएम आणि स्ट्राँग रूमच्या सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपार आदेश, समन्स आणि प्रलंबित गुन्ह्यांबाबतची माहिती दिली. कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील नियंत्रण कक्षांद्वारे संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील १३ स्ट्राँग रूम ठिकाणी सशस्त्र दलाचे जवान आणि आर्मगार्ड तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी ८ पोलीस उपविभागीय अधिकारी, १२ पोलीस निरीक्षक, ५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४६३ पोलीस कर्मचारी आणि सुमारे ८०० होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा

माणिकराव कोकाटे प्रकरणावरून राजकीय हालचालींना वेग; फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल – खातं कुणाकडे जाणार?

Releated Posts

लाडकी बहीण योजना : मकरसंक्रांतीला महिलांसाठी डबल आनंद? डिसेंबर–जानेवारीचे ₹3000 एकत्र जमा होण्याची चर्चा

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी चर्चा रंगली आहे.…

ByByssnews Jan 3, 2026

iPhone 16e Offer : 10 हजार स्वस्त! Croma Year End Sale मध्ये धमाकेदार डील

iPhone 16e offer:- आजच्या काळात स्मार्टफोन म्हटलं की अनेकांच्या मनात सर्वप्रथम iPhone चं नाव येतं. उत्कृष्ट कॅमेरा, दमदार…

ByByssnews Dec 23, 2025

कृष्णप्पा गौतम निवृत्ती; IPL गाजवणाऱ्या कृष्णप्पा गौतमचा निवृत्तीचा निर्णय, 14 वर्षांचा प्रवास संपला

कृष्णप्पा गौतम निवृत्ती:- IPL गाजवणाऱ्या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट भारतीय क्रिकेटमध्ये मोठी घडामोड समोर…

ByByssnews Dec 22, 2025

कल्याण डोंबिवलीत भाजप स्वबळावर? रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक:– कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी…

ByByssnews Dec 22, 2025

जेजुरीत विजयानंतर जल्लोषाला गालबोट; भंडाऱ्याच्या उधळणीत आग, 16 जण जखमी

जेजुरी नगरपरिषद निकालानंतर काय घडलं? भंडाऱ्याच्या उधळणीत आग कशी लागली? (Jejuri fire incident) Jejuri Fire incident:जेजुरी नगरपरिषदेच्या निकालानंतर…

ByByssnews Dec 21, 2025

संदीप नाईक भाजप प्रवेश | नवी मुंबईत शरद पवार गटाला धक्का

संदीप नाईक भाजप प्रवेश का महत्त्वाचा? नवी मुंबईत भाजपची रणनीती संदीप नाईक भाजप प्रवेश: नवी मुंबईच्या राजकारणात सध्या…

ByByssnews Dec 20, 2025

मुंबई महापालिका निवडणूक: ‘लाडक्या बहिणी’ उमेदवारीसाठी पुढे; शिवसेनेत विक्रमी उत्साह

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण तापले असून, यंदाच्या निवडणुकीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. विशेषतः…

ByByssnews Dec 18, 2025

यवतमाळात वाळू तस्करांचा पोलिसांवर हल्ला; जीव वाचवण्यासाठी हवेत गोळीबार, सहाय्यक निरीक्षक जखमी

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात वाळू तस्करीविरोधातील कारवाईदरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. मोरथ–वाकोडी नदीपात्रात अवैध रेती उपसा सुरू असल्याची…

ByByssnews Dec 18, 2025

“बिग बॉस मराठी 6 मध्ये गौतमी पाटील? स्वतः अभिनेत्रीने दिलं स्पष्ट उत्तर”

महाराष्ट्रातील तरुणाईची लाडकी अदाकारा आणि नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या नेहमीच चर्चेत असते. तिचा कार्यक्रम जिथे असेल, तिथे प्रेक्षकांची…

ByByssnews Dec 17, 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top