• Home
  • all updates
  • पुणे–पिंपरीत राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार–तुषार कामठे यांची बंद दाराआड भेट, राजकीय चर्चांना उधाण
Image

पुणे–पिंपरीत राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार–तुषार कामठे यांची बंद दाराआड भेट, राजकीय चर्चांना उधाण

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी जवळपास पूर्ण केली असून, मुंबईत किमान ५० जागांवर पक्ष सज्ज असल्याची माहिती आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. या भेटीनंतर पिंपरी चिंचवडमधील अनेक इच्छुकांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिका निवडणुका स्थानिक पातळीवर एकत्र लढाव्यात, असा प्रस्ताव तुषार कामठे यांनी अजित पवार यांच्यासमोर मांडल्याचे सांगितले जाते. भाजपविरोधी विचारांच्या पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढवावी, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या भेटीनंतर बोलताना तुषार कामठे म्हणाले की, “महानगरपालिका निवडणूक एकत्र लढल्यास भाजपला रोखता येऊ शकते. हा प्रस्ताव मी वैयक्तिकरित्या मांडला असून कोणताही अधिकृत संदेश घेऊन आलो नव्हतो. दादांनी थोडक्यात चर्चा केली, मात्र त्यांनी ऐकून घेतले.”

दरम्यान, पुण्यातील दीर्घ बैठका आटोपून अजित पवार मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडसह पुणे महापालिकेसाठी अजित पवार नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Releated Posts

लाडकी बहीण योजना : मकरसंक्रांतीला महिलांसाठी डबल आनंद? डिसेंबर–जानेवारीचे ₹3000 एकत्र जमा होण्याची चर्चा

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी चर्चा रंगली आहे.…

ByByssnews Jan 3, 2026

iPhone 16e Offer : 10 हजार स्वस्त! Croma Year End Sale मध्ये धमाकेदार डील

iPhone 16e offer:- आजच्या काळात स्मार्टफोन म्हटलं की अनेकांच्या मनात सर्वप्रथम iPhone चं नाव येतं. उत्कृष्ट कॅमेरा, दमदार…

ByByssnews Dec 23, 2025

कृष्णप्पा गौतम निवृत्ती; IPL गाजवणाऱ्या कृष्णप्पा गौतमचा निवृत्तीचा निर्णय, 14 वर्षांचा प्रवास संपला

कृष्णप्पा गौतम निवृत्ती:- IPL गाजवणाऱ्या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट भारतीय क्रिकेटमध्ये मोठी घडामोड समोर…

ByByssnews Dec 22, 2025

कल्याण डोंबिवलीत भाजप स्वबळावर? रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक:– कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी…

ByByssnews Dec 22, 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top