• Home
  • all updates
  • वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू; सिंदेवाही–सावली परिसरात भीतीचे वातावरण
Image

वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू; सिंदेवाही–सावली परिसरात भीतीचे वातावरण

सिंदेवाही / सावली (चंद्रपूर):

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही आणि सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सिंदेवाही तालुक्यातील गंजेवाही परिसरात पहिली घटना घडली. येथील अरुणा ऊर्फ छाया अरुण राऊत (वय ४९, रा. सिंदेवाही) या शनिवारी (ता. १३) संध्याकाळच्या सुमारास शेताजवळील परिसरात तुरी पाहण्यासाठी गेल्या होत्या. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्या बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, जंगलालगतच्या नाल्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात आली. वनविभागाकडून मृत महिलेच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

दरम्यान, दुसरी घटना सावली वनपरिक्षेत्रात घडली. मूल तालुक्यातील बेलघाटा येथील पितांबर गुलाब सोयाम (वय ३६) हे शनिवारी जनावरे चराईसाठी जंगलात गेले होते. सावली वनपरिक्षेत्रातील एका कंपार्टमेंट परिसरात वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले.

रात्री जनावरे गावात परतली मात्र पितांबर सोयाम परतले नाहीत. याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर रविवारी सकाळी शोधमोहीम राबवण्यात आली. त्यावेळी जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला.

सलग दोन घटनांमुळे सिंदेवाही आणि सावली परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Releated Posts

लाडकी बहीण योजना : मकरसंक्रांतीला महिलांसाठी डबल आनंद? डिसेंबर–जानेवारीचे ₹3000 एकत्र जमा होण्याची चर्चा

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी चर्चा रंगली आहे.…

ByByssnews Jan 3, 2026

iPhone 16e Offer : 10 हजार स्वस्त! Croma Year End Sale मध्ये धमाकेदार डील

iPhone 16e offer:- आजच्या काळात स्मार्टफोन म्हटलं की अनेकांच्या मनात सर्वप्रथम iPhone चं नाव येतं. उत्कृष्ट कॅमेरा, दमदार…

ByByssnews Dec 23, 2025

कृष्णप्पा गौतम निवृत्ती; IPL गाजवणाऱ्या कृष्णप्पा गौतमचा निवृत्तीचा निर्णय, 14 वर्षांचा प्रवास संपला

कृष्णप्पा गौतम निवृत्ती:- IPL गाजवणाऱ्या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट भारतीय क्रिकेटमध्ये मोठी घडामोड समोर…

ByByssnews Dec 22, 2025

कल्याण डोंबिवलीत भाजप स्वबळावर? रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक:– कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी…

ByByssnews Dec 22, 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top