सोलापूर शहरातील दमाणीनगर परिसरातील रेल्वे पुलाच्या पाडकामासाठी रविवारी (ता. १४) रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ब्लॉकदरम्यान ९ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून, ९ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या मधल्या स्थानकांपर्यंतच धावणार असून नियोजित मार्गावर जाणार नाहीत.
मात्र प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सिद्धेश्वर एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आणि हुतात्मा एक्स्प्रेस या गाड्या नेहमीप्रमाणे सुरळीत धावणार आहेत. तसेच सोलापूर–पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (इंद्रायणी) ही गाडी या दिवशी कुर्डुवाडी स्थानकावरूनच परतीचा प्रवास करणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना प्रवास नियोजन करताना अधिकृत वेळापत्रक व सूचना तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














